सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा असे प्रतिपादनही भागवत यांनी केले.

 

ते उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये संघाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, ‘लवकरच एका भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यात येईल. राम मंदिर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर संघा राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल,’ असे मोहन भागवत म्हणाले.

 

तसेच CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरही चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतप्रदर्शन केले. याबाबत बोलताना भागवत म्हणाले, ‘सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असे ते म्हणाले.

 

दरम्यान, मोहन भागवत यांनी याआधी डिसेंबर महिन्यात देशातली 130 कोटी जनता हिंदूच आहे असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलाच वाद ओढवला होता. आता त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणे गरजेचे असल्याचे असं वक्तव्य केले आहे.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: