भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिखर बँकेप्रकरणी खरे बोल सुनावले आहेत. खडसे विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत असताना राज्य शिखर बँकेसंदर्भात अनेकदा बोलले होते. परंतु बँकेच्या प्रकरणात खा. शरद पवार यांचा काहीही संबंध नव्हता.

पवार यांचे कधीही त्यात नाव नव्हते हे मी जबाबदारीने सांगू शकतो, असे वक्तव्य खडसे यांनी केले आहे. त्यामुळे बँकेच्या गैरव्यवहाराशी पवार यांचे नाव कसेकाय जोडले गेले, याबाबतच खडसे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

राज्य शिखर बँकेसंदर्भात शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. परंतु बँकेमध्ये सध्या सदस्य पदावरही पवार कार्यरत नसताना त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राज्यभरात झंझावात सुरू केला आहे. राज्याच्या जनतेमधून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पवार यांना मिळणारा हा प्रचंड प्रतिसाद पाहिल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच जाणीवपूर्वक निवडणुकांच्या तोंडावर ही कारवाई केली जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.                                                                                                                                        


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: