चंद्राच्या पृष्ठभागावरुन दोन किमी दूर गेलेल्या चांद्रयान 2 मधील विक्रम लॅन्डर सोबत संपर्क साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच इस्रो कडून ही विक्रम लॅन्डर झुकलेल्या अवस्थेत असला तरीही त्याच्या सोबत संपर्क साधण्याच्यासाठी प्रत्येक मार्गाचा वापर करत आहेत.
दुसऱ्या बाजूला अमेरिकेतील स्पेस सेंटर नासा यांनी सुद्धा लॅन्डर सोबत संपर्क साधण्यासाठी 'हॅलो' मेसेज पाठवला आहे. 7 सप्टेंबर रोजी विक्रम लॅन्डर याची हार्ड लॅन्डिंग झाल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागावर पडला आहे.
लॅन्डरला एक ल्यूनर डे साठी थेट सूर्याचा प्रकाश मिळू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच 14 दिवस लॅन्डरला सूर्याचा प्रकाश मिळणार आहे. या दरम्यान इस्रो लॅन्डर सोबत संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करु शकतात.
मात्र 14 दिवसानंतर मोठी रात्र होणार असून त्यावेळी जरी लॅन्डरने सॉफ्ड लॅन्डिंग केले तरीही ते सुस्थितीत राहणे मुश्कील आहे. विक्रम लॅन्डरने चंद्राच्या पृष्ठभागावर लॅन्डिंग करुन 6 दिवस झाले आहेत. त्यामुळे 20-21 सप्टेंबर पर्यंत जर लॅन्डर सोबत संपर्क न झाल्यास त्याच्या सोबत पुन्हा संपर्क साधता येणार नाही.
तसेच एका अन्य आंतराळ वैज्ञानिक स्कॉट टॅली यांनी असे म्हटले आहे की, नासाने त्यांच्या DSN च्या माध्यमातून विक्रम लॅन्डरला संदेश पाठवला आहे. त्यांनी ट्वीट करत असे म्हटले, DSN ने 12 किलोवॅट रेडिओ फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून विक्रम लॅन्डरसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
तर नासाला चांद्रयान 2 मोहिमेबाबत अधिक उत्सुकता लागली आहे. कारण चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरच्या माध्यमातून त्यांना महत्वाची माहिती मिळू शकते असे सांगण्यात येत आहे. ऑर्बिटरमध्ये 8 अत्याधुनिक पेलोड्स आहेत. तसेच नासाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे फोटो याच्या माध्यमातून मिळू शकतात अशी आशा आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel