काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर आता काश्‍मीरमधील परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, काश्‍मीरची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नजरकैदेत असलेल्या ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासारख्या स्थानिक काश्‍मिरी नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू करण्यात आले आहेत. त्याबरोबरच काश्‍मीरप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलावून तेथील परिस्थितीची माहिती देण्याचा विचार सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती पुर्ववत होण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर आहेत ते परत आल्यानंतर याबाबत एक बैठक होणार आहे. तसेच या बैठकीत काश्‍मीरविषयी निर्णय होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून काश्‍मीर खोऱ्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तेव्हापासून खोऱ्यात संचारबंदीसारखी परिस्थिती आहे. दरम्यान, 15 ऑगस्टपासून खोऱ्यातील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र इथल्या फुटीरवादी नेत्यांनी मोर्चाचे आवाहन केल्यानंतर काही ठिकाणी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.                                                                                    


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: