टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टच्या 4.4 कोटी युजर्सचे नाव आणि पासवर्ड लीक झाले आहेत. कंपनीला या सिक्युरिटी ब्रिचबद्दल माहिती मिळालेली आहे. एका रिपोर्टनुसार, मायक्रोसॉफ्ट थ्रेट रिसर्च टिमने या सर्व अकाउंट्सला या वर्षी जानेवारी आणि मार्चमध्ये तपासले होते व त्यांच्या डेटाबेसला 3 बिलियन लीक्ड क्रेडेंशियल्ससोबत जोडले होते. या तपासणीत जवळपास 4.4 कोटी युजर्सचे क्रेडेंशियल्स लीक झाले आहेत.
मायक्रोसॉफ्टला लीकबद्दल माहिती मिळताच कंपनीने युजर्सला अकाउंट रिसेट करण्यासाठी लिंक पाठवली आहे. एंटरप्राइजेस अकाउंट युजर्सला एडमिनिस्ट्रेटर्स अलर्ट करण्यात आले आहे.
डेटा लीक होण्याच्या अनेक घटना यावर्षी पाहण्यास मिळालेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टचे अधिकतर एंटरप्राइजेस युजर्स आहेत. त्यामुळे याचा परिणाम त्याच युजर्स अधिक होईल. मायक्रोसॉफ्टचे विंडोस युजर्स देखील लीकचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे युजर्सला आपल्या सिस्टमला नवीन सिक्युरिटी पॅचमध्ये अपडेट करावे लागेल. जर तुम्ही देखील मायक्रोसॉफ्टचे युजर्स असाल तर तुमची खाजगी माहिती अपडेट करा व नाव, पासवर्ड नक्की बदला.
click and follow Indiaherald WhatsApp channel