जर तुम्ही दहावी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्याकडे रेल्वेमध्ये निघालेल्या नोकरीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. नॉर्त ईस्ट रेल्वेने अप्रेंटिस अंतर्गत विविध पदांसाठी भरती काढली आहे. एकूण 1104 पदांसाठी भरती असून, अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2019 असून, उमेदवारांची नियुक्ती वर्कशॉप/युनिटमध्ये होईल. फिटर, वेल्डर, इलेक्ट्रेशियन, पेंटर, कारपेंटर आणि मशिनिस्ट या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.
योग्यता –
या पदांसाछी 10वी पास कोणीही अर्ज करू शकते. उमेदवाराकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
वयाची अट –
उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा कमी नसावे, तर 25 डिसेंबर 2019 पर्यंत 24 पेक्षा अधिक नसावे. अर्ज फी 100 रुपये असून, उमेदवारांची निवड दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर करण्यात येईल.
असा करा अर्ज –
इच्छुक उमेदवार नॉर्थ ईस्ट रेल्वेची वेबसाइट ner.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
click and follow Indiaherald WhatsApp channel