सध्या भारत आणि दक्षिण अफ्रिका संघांमध्ये टी20 मालिका खेळली जात असून, मालिकेतील अंतिम सामना रविवारी बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. दक्षिण अफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला आगामी कसोटी मालिकेसाठी भारतात रवाना होताना त्याला अडचणींचा सामना करावा लागला. फाफ डू प्लेसिस दक्षिण अफ्रिकेच्या टी20 संघाचा भाग नव्हता.
ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटला 4 तास उशीर झाल्याने एका खराब अनुभवाला सामोरे जावे लागले. डू प्लेसिसने आपला राग ट्विटरवर व्यक्त करत लिहिले की, अखेर चार तासानंतर दुबईच्या फ्लाइटमध्ये बसलो. आता माझी भारताची फ्लाइट देखील सुटेल. कारण दुसरी फ्लाइट 10 तासानंतर आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रिटिश एअरवेजच्या या फ्लाइटमध्येच डू प्लेसिसची बॅट आणि क्रिकेट किट देखील राहिले. यावर डू प्लेसिसने दुसरे ट्विट केले की, जेव्हा आयुष्यात अडचणी येतील तेव्हा त्याचाही फायदा घ्या. माझी क्रिकेट बॅग आली नाही. यावर मी केवळ हसू शकतो. वाह, ब्रिटिश एअरवेज, हा माझा आजपर्यंतचा सर्वात खराब फ्लाइटचा अनुभव होता. मी आशा करतो की, माझ्या बॅट्स परत येतील.
डू प्लेसिसच्या या ट्विटर ब्रिटिश एअरवेजने देखील उत्तर दिले. मात्र युजर्सनी ब्रिटिश एअरवेजला ट्रोल करण्यास सुरूवात केली. दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. तर 2 ऑक्टोंबर पासून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel