पुणे – पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाची लागण ५ जणांना झाल्याचे समोर आले आहे. ३ महिला तर २ पुरुषांचा यामध्ये समावेश असल्याची ही माहिती पिंपरी – चिंचवड महानगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे एकट्या पुण्यामध्ये आता कोरोनाग्रस्तांचा आकडा १५ वर गेला आहे.
कोरोना बधितांची पिंपरी-चिंचवडमध्ये संख्या ही आता ८ वर पोहचली असून पुण्याचे ७ जण पॉझिटिव्ह आहेत. सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील पहिला दुबईहून आलेला पहिल्या ग्रुपमध्ये असलेल्या ४० जणांपैकी ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक जण थायलंडहुन पिंपरी-चिंचवडला आला आहे. तो पॉझिटिव्ह निघाला असून या सर्वांवर पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व पाहता महानगर पालिकेच्या प्रशासनाकडून रात्री उशिरा बैठक बोलावण्यात आली असून कोरोनाच्या विरोधात कसे दोन हात करायचे यावर चर्चा सुरू आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel