अमेरिकेतील ह्युस्टन मध्ये आयोजित हाउडी मोदी कार्यक्रम नुकताच दिमाखात पार पडला. या कार्यक्रमच विशेष आकर्षण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसून आले.

ह्युस्टन च्या एन आर जी स्टेडीयम मध्ये ५० हजार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांना मोदींनी संबोधित केले. या कार्यक्रमाचे भारतीयांनी तोंडभर कौतुक केले असले तरी अमेरिकन प्रसारमाध्यमांनी या हाउडी मोदी म्हणजे निव्वळ तमाशा असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या एक वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये ट्रम्प यांनी लोकांचे समर्थन मिळवले होते. त्याप्रमाणे ते आताही भारतीय मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेतील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी राजकीय रॅली होती. उजव्या विचारसरणीचे असणारे दोन्ही नेते एकाचवेळी व्यासपीठावर आले होते.

जनतेला आवडणारी आश्वासने देत त्यांनी सत्ता मिळवली होती. दोघांनीही आपल्या देशाला महान बनविण्यासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक भाषणे दिली होती. मोदीनीही भारतीय अमेरिकन नागरिकांना अबकी बार ट्रम्प सरकार असे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात ट्रम्प यांना मते मिळविणे सोपे राहणार नाही. असे म्हंटले आहे.

टेक्सास इंडिया फोरमद्वारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल होत. ‘सामायिक स्वप्नं, उज्ज्वल भविष्य’ (शेयर्ड ड्रीम्स, ब्राइट फ्यूचर्स’) या शीर्षकाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमाने भारत आणि अमेरिकेचे राजकीय, आर्थिक, आणि सामाजिक संबंध घट्ट व्हावेत, या शिवाय संस्कृती आणि व्यापार आदि विषयांवर ही राजकीय रॅली आयोजित करण्यात आली होती.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: