राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजप नेते आणि पालकमंत्री राम शिंदे (Ram Shinde vs Rohit Pawar) आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू रोहित पवार मैदानात आहेत. रोहित पवारांनी काल अर्ज दाखल केल्यानंतर आज राम शिंदे आपली ताकद दाखवणार आहेत.
राम शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी उदयनराजे भोसले, गिरीश महाजन हे नगरमध्ये दाखल झाले आहेत. राम शिंदे तिसऱ्यांदा आपला अर्ज दाखल करत आहेत.
राम शिंदे यांनी वृद्ध आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. यावेळी आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. मुलाला अतिशय कष्टातून मी शिकवलंय, दुसऱ्याच्या शेतात काम करुन मुलांना लहानाचे मोठे केले, आज त्याला मंत्री म्हणून पाहताना आनंद होतो, अशी भावना त्यांनी टीव्ही 9 मराठीकडे व्यक्त केली.
खूप गरीब परिस्थिती होती, आज चांगले दिवस आले आहेत. मुलाला नेहमीच आशीर्वाद आहे, असं राम शिंदे यांची आई म्हणाली. घराणेशाई समोर लोकशाहीचा विजय होईल, समोरचा उमेदवार किती मोठा असला तरी केलेल्या कमांच्या जोरावर शिंदेसाहेब निवडून येतील असा विश्वास राम शिंदेंच्या पत्नी आशा शिंदे यांनी व्यक्त केला.
click and follow Indiaherald WhatsApp channel