औरंगाबाद : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळीही 24 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या ही 651 वर गेली आहे. तर शहरात आतापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
दरम्यान आतापर्यंत औरंगाबादेतील 113 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सोमवारी कोरोनामुळे दोघांचा बळी गेला. एकूण 15 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. औरंगाबादेत सोमवारी दिवसभरात एकूण 69 कोरोनाबाधित आढळले.
यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 651 वर गेली. सोमवारी दुपारनंतर 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे एकूण डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या 113 वर गेली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel