विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्वासातल्या नेत्यांनीच पवारांची साथ सोडली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर टीका केली आहे. तर पद्मसिंह पाटील आणि मधुकर पिचड सारख्या नेत्यांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे.

मागील 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागतो, ही अतिशय दुर्देवाची गोष्ट असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. संवाद दौऱ्याच्या निमित्ताने ठाणे येथे आले असता. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणल्या की, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाजप कडून दबाव आणला जात आहे. कोणाची बॅंक घोटाळे, कारखाने, तर कोणाची चौकशी लावू म्हणून पक्षात घेतले जात आहे. पण हे मोठे दुर्दैव आहे. 40-40 वर्षे एका पक्षाशी निष्ठा ठेवल्यानंतर केवळ पुत्र प्रेमासाठी आणि त्याच्या स्वार्थासाठी नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत.

परंतु, जात असतांना दुसऱ्या पक्षाच्या काल परवा झालेल्या नेत्यांपुढे मुजरा करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही वंशाच्या दिवा नसलो तरी आम्ही स्वाभिमानी असून आम्ही आमच्या वडिलांना आमच्या स्वार्थासाठी कुणापुढेही मुजरा करायला लावत नाही, असा टोला पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना लगावला आहे


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: