काही दिवसापूर्वीच अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये पदार्पण करीत असलेल्या ‘ट्रिपल एक्स – द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यात दीपिकाच्या मुखातून एकही डायलॉग बाहेर न पडल्यामुळे तिचे चाहते मात्र नाराज झाले होते. दीपिकाने आता कॅमेऱ्याच्या मागचा एक व्हिडिओ प्रसिध्द केला असून ती यात विन डिजेलच्या बाहुपाशात विसावलेली दिसते.
दीपिकाने ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांना सबूरीचा सल्ला दिला होता. लवकरच दुसरा ट्रेलर येणार असून त्यात तिला अधिक प्रसिध्दी मिळणार असल्याचे संकेतही तिने दिले होते. दरम्यान तिने ‘ट्रिपल एक्स – द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ चित्रपटाच्या मेकिंगमधील एक व्हिडिओ चाहत्यांसाठी इन्स्टाग्रमवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत ती ‘ट्रिपल एक्स – द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’च्या सेटवर दिसते. तिचा सहअभिनेता विन डिजेलने तिला उचलून बाहुपाशात घेतले आहे. तो तिला उचलून दूर घेऊन जाताना दिसतो.
click and follow Indiaherald WhatsApp channel