नुकतेच अभिनेता इरफान खान आणि करिना कपूर यांच्या बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मेडियम’मधील ‘कुडी नू नाचने दे’ हे नवेकोरे गाणे रिलीज करण्यात झाले आहे. राधिका मदन, आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा, जान्हवी कपूर, कियारा अडवाणी आणि अनन्या पांडे अशा दिग्गज तारकांनी प्रत्येकाला ताल धरायला लावणाऱ्या या गाण्यात ठेका धरला आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘अंग्रेजी मेडियम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर लोकांच्या खूप पसंतीला उतरला असून चाहत्यांकडून या चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू आहे. इरफान खान दोन वर्षानंतर या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर परतणार असल्यामुळे प्रेक्षक आतूर झाले आहेत. १३ मार्चला ‘अंग्रेजी मेडियम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel