मुंबई – शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना त्यांचा राजीनामा ही केवळ अफवा असून आपल्या मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला नाही. ते उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतील अशी माहिती दिली. माझे आणि सत्तार यांचे बोलणे झाले असून आता त्यांची कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावाही खोतकर यांनी केला आहे.
माझे सत्तारांशी बोलणे झाले असून राजीनामा दिला या केवळ अफवा आहेत. त्यांची आता कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. त्यामुळे हा विषय आता संपला असल्याचे खोतकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सत्तार यांनी चर्चा केली आहे. उद्या दुपारी साडेबारा वाजता ते मुख्यमंत्र्यांची मातोश्री येथे भेट घेणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचे मी खंडन करतो. उद्या ते सर्व विषयांवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करतील, असेही ते म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel