राज्याच्या राजकारणात आणखी एक ट्वीस्ट आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सह्याद्री अतिथी गृहात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत जनतेने महायुतीला संपूर्ण बहुमत दिलं तर भाजपने १०५ जागी विजय मिळाला. मात्र सरकार स्थापन करता आलं नाही. शिवसेनेने पहिल्या दिवसापासून बार्गेनिंगला सुरवात केली. मात्र शिवसेना चर्चेला आली नाही.

न ठरलेल्या बाबीचा बाऊ करून शिवसेनेने चर्चा थांबवली, मात्र भाजपने कायम तात्विक भूमिका मांडली. अनेक दिवस वाट पहिली. मात्र शिवसेना आली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसशी मात्र चर्चा करत होते.

आमच्याकडे योग्य संख्याबळ नसल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकलो नाही. शिवसेनेला संधी मिळाली मात्र त्यांनी स्वतःच हस करून घेतलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसही सरकार स्थापन करण्यास अपयशी ठरलं. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागली. राष्ट्रपती राजवट लागूनही शिवसेना,

कॉंग्रेस, राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करून सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे अजित पवारांनी आम्हाला पाठींबा देत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज अजित पवारांनी आपली असमर्थता दाखवत आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यामुळे भाजप कडेही सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने मीही माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. तर भाजप पक्ष हा विरोधी बाकावर बसून जनतेचे प्रश्न किफायतशीरपणे सोडवणार आहे. तसेच माही जनतेचे आभारी आहोत. त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल भाजप पक्षाकडून आभार मानत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: