राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही, कोणावर अन्याय केलेला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर अथवा पक्षाच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर खपवून घेणार नाही आणि मी तोंड उघडले तर तुम्हाला अडचण होईल, असा इशाराच खासदार सुप्रिया सुळे यांनी गयारामांना दिला.

सणसवाडी (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.

या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, सदस्या कुसुम मांढरे, राजेंद्र जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष रवी काळे, दिलीप वाळेकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, पंचायत समितीच्या उपसभापती जयमाला जकाते, माजी उपसभापती मोनिका हरगुडे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वास ढमढेरे, ज्ञानेश्वर थेऊरकर, मयूर करंजे यांसह आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, कोणीही पक्षातून गेल्यास पक्षावर काहीही परिणाम होणार नाही. इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीने काही बोललेले नसल्याचे सांगत हर्षवर्धन पाटील यांनी मी आणि राहुल गांधी व हर्षवर्धन पाटील कधी भेटले हे दाखवून द्यावे आणि याबाबत मी इंदापूरला जाऊन बोलणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांसह आदींनी मनोगत व्यक्त केले.      


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: