अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बरेच जण टिका करतात तर काही जण त्यांची बाजु घेतात. मात्र, तेलंगाणामधील एका 32 वर्षीय तरुणाने आपल्या घरावर ट्रम्प यांचा पुतळा बसवला असुन तो त्यांची पूजा करतो आणि त्यांना देवाच्या स्थानी मानतो. त्यामुळे या तरुणाची आणि त्या पुतळ्याची चर्चा संपुर्ण राज्यासह देशभरात होताना दिसून येत आहे.
जनगाव जिल्ह्यातील कोण्णे या गावचा शेतकरी असलेल्या 32 वर्षीय कृष्णाने आपल्या घरात ट्रम्प यांचा सहा फुट उंच असा पुतळा उभा केला असुन तो त्याची रोज पुजा आणि आरती करतो. त्याने ट्रम्प यांच्या साठी एक आरतीही तयार केली असुन आपल्या पुजेच्या वेळी तो ही आरती गातो असे स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे. यावेळी कृष्णाला या बाबत विचारले असता तो म्हणाला की, त्याला ट्रम्प हे सध्या जगातील सर्वात ताकदवान राष्ट्रपती असुन त्याला त्यांचा धाडसी दृष्टीकोन आवडतो. त्यामुळे तो त्यांची पूजा करतो. त्याला एकदिवस ट्रम्प यांना भेटण्याची इच्छा देखील असुन तो त्यासाठी प्रयत्नशील आहे.
तर, कृष्णा यांच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलाने ट्रम्पयांचा पुतळा तयार करुन घेण्यासाठी 1 लाख तीस हजार रुपयांचा खर्च केला असुन त्यांच्या 73 व्या वाढदिवसा निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याने आपल्या घराच्या बाहेर एक मोठे बॅनर लावले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel