ओतूर : कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पुराने तिथल्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. अनेक संसार उघड्यावर आले आहेत.पुराचे पाणी हळुहळु ओसरल्यानंतर आता सर्वस्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. त्यातच आता ओतूरकरांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ओतूर व पंचक्रोशीतील सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वच नागरिक एकत्र आले आहेत. तसेच सर्वांनी मिळून जमेल तशी प्रत्येकाने मद केली आहे.

सकाळी पांढरी मारुती मंदिर परिसरात धान्य, कपडे, बिस्किटे, पाणी बॉटल , औषधे मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्त बांधवाना मदत करण्यात आले आहे. सर्व वस्तूंचे योग्यपद्धतीने वस्तूचे विभाजन व पॅकिंग करून पुरग्रस्त भागात वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. ओतूरमधील प्रत्येक वार्डमध्ये गाडी फिरवून वस्तू गोळा करण्यात आल्या तसेच शेजारील धोलवड, ठिकेकरवाडी, हिवरे खुर्द, उदापूर, आंबेगव्हाण, खामुंडी या गावच्या ग्रामस्थांनीदेखील यात सहभाग घेतला.

यावेळी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे विद्यार्थी, चैतन्य विद्यालयाचे विद्यार्थी, गजानन महाराज शिक्षण प्रसारक विद्यालयाचे विद्यार्थी ओतूर गावच्या महिलांनी व युवकांनी या पूरग्रस्त मदत आभियानामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. या अभियानात भाग घेतलेल्या सर्वांचे पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांनी आभार मानले.


Find out more: