दूरसंचार कंपनी व्होडाफोनने एअरटेल आणि जिओला टक्कर देण्यासाठी 69 रूपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या आधी कंपनीने ऑल राउंडर पॅक सीरिज अंतर्गत 35 रूपये, 65 रूपये, 145 रूपये आणि 245 रूपयांचे रिचार्ज पॅक बाजारात आणले होते.
या प्लॅनचा कालावधी हा 28 दिवसांचा असून, यामध्ये ग्राहकाला कॉलिंगसाठी फ्री मिनिटे दिली जातील. मात्र यामध्ये टॉकटाइम मिळणार नाही.
69 रूपयांचा प्री-पेड प्लॅन –
व्होडाफोनने हा नवीन प्लॅन बिहार, तेलंगाणा, दिल्ली, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लाँच केला आहे. ग्राहकांना या पॅकमध्ये 150 लोकल आणि एसटीडी मिनिटांबरोबर 250 एमबी डाटा देखील मिळेल. याचबरोबर 100 एसएमएसची सुविधा देखील मिळेल. या रिचार्ज प्लॅनचा कालावधी ग्राहक वाढवू देखील शकतात.
व्होडाफोन-आयडियाच्या युजर्सना आययुसी चार्ज द्यावा लागणार नाही. कंपनीने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येईल.
click and follow Indiaherald WhatsApp channel