दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर शाब्दिक निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे, जगाचे युगपुरुष आहेत. आमचे ते दैवत आहेत. आमचा जीव गेला तरी चालेल मात्र छत्रपतींचा अपमान आम्हाला चालणार नाही. जर कुणी अपमान करत असेल आणि विनाकरण आम्हाला प्रश्न विचारत असतील तर आज ते का शांत बसले आहेत? असे राऊत म्हणाले.
ते म्हणाले की, ‘संभाजी भिडे तसेच भाजप यांनी या चित्रफितवर प्रतिक्रिया दिल्यावर आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या,’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel