औरंगाबाद : औरंगाबाद येथील कोरोना संशयित रुग्णांची संख्या आता 7 वर गेली आहे. यात आधीच 59 वर्षीय महिला कोरोना बाधित असून 2 आधीचे आणि 4 नवीन संशयितांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यात एक महिला सिक्कीमहुन परतलेली असून या सर्वांचे सव्याब टेस्टसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, पुण्यात कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. पुण्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत 18 वर पोहचली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. संबधीत रुग्ण हा फ्रान्स आणि नेदरलँडमधून प्रवास करुन आला होता. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel