भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. सिंधूने शनिवारी झालेल्या सामन्यात चिनी प्रतिस्पर्धी शेन युफेईला 39 मिनिटांच्या खेळातच नमवले. तिने युफेईला 21-7, 21-14 असे दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.  त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक देण्याचा विक्रम सिंधूने आपल्या नावे केला आहे.  

सामन्याला सुरुवात झाल्यापासूनच सिंधूने वर्चस्व राखले. त्यामुळे पहिला सेट तिने 21-7 अशा मोठ्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्येही तिने कामगिरीत सातत्य राखले. तिने आक्रमक खेळत दुसरा सेटही 21-14 ने आपल्या नावावर करून अंतिम फेरी गाठली. 

दरम्यान, सिंधूने ताई त्झू यिंगचा 12-21, 23-21 आणि 21-19 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. आता उपांत्य फेरीत एकहाती विजय मिळवलेल्या सिंधूपासून जागतिक विजेतेपद केवळ एक पाऊल दूर आहे.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: