मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा करून औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा घटना घडणार नाहीत यादृष्टीने कठोर पावले उचलावीत असे निर्देश दिले.
तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी कामगार विभागाचे प्रधान सचिव करणार असून जबाबदारीही निश्चित करण्यात येईल. तारापूरपूर्वी डोंबिवली येथे प्रोबेस कंपनीच्या स्फोटाची घटना घडली होती. अशा स्वरूपाच्या घटना घडून औद्योगिक सुरक्षा धोक्यात येऊ नये म्हणून सर्वच धोकादायक वर्गातील उद्योगांची तपासणी उद्योग व त्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्फत करण्याचे तसेच सेफ्टी ऑडिट करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel