नागपूर : नागपूरात आज कोरोना व्हायरसचे 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी कोरोनाचे एवढे बाधित रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. एकदाच एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनावर ताण पडला आहे.
बाधित रुग्णांपैकी काही जणांचा दिल्ली प्रवासाचा इतिहास आहे. तर काहीजण मोमीनपुरा येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या 24 तासात शहरात 14 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 41 वर पोहचली आहे. याबाबतची माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel