इंदिरा गांधींबद्दलच विधान मी स्वत: मागे घेतलं असून कोणी मला तसं सांगितलं नसल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. इंदिरा गांधींबद्दल कोणताही वाद होऊ नये म्हणून आपण हे वक्तव्य मागे घेतल्याचं राऊत यांनी स्पष्ट करतानाच आपण कोणाचं ऐकणारा माणूस नसल्याचही राऊतांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना सांगितलं.
पुढे असेही म्हणाले की विषय कॉंग्रेसच्या नाराजीचा नसून, इंदिराजींचे नाव कुठल्याही वादात नको म्हणून आपण ते विधान मागे घेतलं आहे. तसेच इंदिराजिंबद्दल मी पाठराखण करणारी भूमिका सतत संसदेत मांडली आहे असा दावाही त्यांनी केला . तसेच राणे पिता पुत्रांच्या टीकेला उत्तर देताना टीका करणाऱ्यांना काही काम नव्हत या निम्मिताने काहीतरी काहीतरी काम मिळालं, असा टोला राउत यांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला.
तसेच कोणी काय टीका करताय यावर प्रतिक्रिया द्यायला मला वेळ नाही. आम्हाला जनतेसाठी काम करायचं असून आम्ही सरकारच्या मध्यमातून ते काम करण्यात जास्त वेळ घालवू इच्छितो असेही राउत पत्रकारांशी बोलताना म्हटले. विरोधीपक्षाने स्वतःची प्रतिष्ठा जपावी असाही सल्ला राऊत यांनी यावेळी भाजपला दिला. तसेच विरोधी पक्षाला माझ्या शुभेच्छा असल्याचेही राउत म्हणाले. नारायण राणे यांच्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याला काही माहिती नसल्याच म्हटलं.
click and follow Indiaherald WhatsApp channel