मुंबई : पुण्यातील एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली मुलाखत विविध वक्तव्यांमुळे चांगलीच गाजली आहे. त्यांनी या मुलाखतीत भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता.
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना करा, असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या असे आव्हान संजय राऊतांनी दिल्यानंतर संजय राऊतांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी दर्शविली होती. या वादात आता माजी खासदार निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. फक्त 10 मिनिटांसाठी संजय राऊतांची सुरक्षा हटवा, मग काय होते ते बघा असे खुले आव्हान त्यांनी राऊतांना दिले आहे.
संजय राऊत यांनी मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना भाजपचे नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला. उदयनराजे हे साताऱ्याचे माजी खासदार ते भाजपचे नेते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीचे वंशज आहेत. आम्ही शरद पवारांना जाणते राजे मानतो तर उदयनराजे ना राजे मानतो. शरद पवार हे जाणते राजे जनतेने उपाधी दिली हिंदूहृदयसम्राट ही उपाधी बाळासाहेबांना जनतेने दिली आहे. रयतेचा राजा लूटमार करणारे राजे होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना टोला लगावला.
click and follow Indiaherald WhatsApp channel