मुंबई महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या दोनदिवसीय राज्यव्यापी अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, भाषा कुठलीही वाईट नसते. पण जी भाषा आपण शिकवता त्यातून परदेशाचा इतिहास शिकवण्यापेक्षा आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा इतिहास शिकवा.
आपल्याला फ्रेंच क्रांती शिकून काय करायचे आहे? इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून आम्ही इतिहासाला हात लावणार नाही, असे करू नका. मुलांना आपली संस्कृती शिकवा, ती मुलांमध्ये रूजवा, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. शिक्षक इतरही गोष्टी शिकवू शकतात. हाच विचार इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी केला तर फार मोठा बदल होईल, असेही राज ठाकरे यांनी मत मांडले.
click and follow Indiaherald WhatsApp channel