नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट आहे. दिल्लीत उद्भवलेल्या स्थितीला केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. ही जबाबदारी स्वीकारत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. दिल्लीमध्ये शांतता राखण्यात दिल्लीचे मुख्यमंत्रीही अयशस्वी ठरले आहेत.
त्यांनी जबाबदारी न घेतल्यानेच दिल्लीत अशी स्थिती झाल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार, गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षाच्या कार्य समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोनिया गांधी बोलत होत्या.
रविवारी गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते? हिंसा होत असलेल्या ठिकाणी किती पोलीस होते? परिस्थिती चिघळत असतानाही सैन्याचे जवान तिथे का गेले नाहीत? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय करत होते? असे अनेक सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी यावेळी उपस्थित केले.
चिदंबरम यांनी पोलिसांवर निशाणा साधला. बैठकीपूर्वी काँग्रेस नेता आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिल्ली पोलिसांवर निशाणा साधला. चिदंबरम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, गृहमंत्री असो किंवा गृहमंत्रालय हिंसा रोखणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गेल्या सोमवारपासून हिंसेच्या घटना घडत आहेत. यावरुन दिल्ली पोलिसांचे अपसय़ स्पष्ट होते असेही चिदंबरम म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel