कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सोनिया गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारसमोर कोरोनाबाबतच्या उपाययोजनांंबाबत काही सवाल उपस्थित केले.


यावेळी सोनिया गांधी म्हणल्या की, सोनिया गांधी यांनी लॉकडाऊन 3 चा कालावधी संपल्यानंतर पुढे काय? आणि कोणतं धोरण राबवणार आहोत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर मोदी सरकारचं करोनाशी दोन हात करण्याचं धोरण काय आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला आहे.

 

तर सध्या देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 41 दिवसांत देशात कोरोनाबाधितांची संख्या 40000 च्या पुढे गेली आहे. मात्र यावर नियंत्रण आणणे अवघड जात आहे. दुसरीकडे लॉकडाऊन असल्याने सर्व कामं ठप्प झाल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा हाल होत आहे. अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येत असल्याने जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


दरम्यान देशभरात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. केंद्र सरकारने 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. मात्र 17 मेनंतर पुढे काय असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस खासदार राहुल गांधी हेदेखील सहभागी झाले होते.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: