बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्री कल्कि कोचलिनने 7 फेब्रुवारी रोजी कल्किने गोव्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीला जन्म दिला आहे. कल्किने बॉयफ्रेंड गाय गाय हर्शबर्गच्या बाळाला जन्म दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कल्कि आणि गाय रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय कल्किने घेतल्यापासून ती आणखी चर्चेत आहे. कल्किने आपण बाळाला वॉटर बर्थ देणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. तिने त्याचप्रमाणे गोव्यात बाळाला जन्म दिला आहे.
विशेष म्हणजे कल्किचा जन्म देखील गोव्यात झाला होता. आपल्या गरोदरपणाची बातमी कल्किने कुणापासूनही लपून ठेवली नाही. कायमच आपल्या बेबी बंपचे फोटो कल्कि सोशल मीडियावर शेअर करत होती. कल्किचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्ग हा शास्त्रीय पियानोवादक आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इंस्टाग्रामवर कल्किने बाळाला जन्म दिल्याची बातमी शेअर केली आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देव डी’ चित्रपटाच्या माध्यामातून कल्किने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दिग्दर्शक अनुराग कश्यपची कल्कि पहिली पत्नी आहे. 30 एप्रिल 2011 मध्ये अनुराग कश्यपसोबत उटीमध्ये कल्किने लग्न केले होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel