इंदूर : बांगलादेशविरुद्धच्या इंदूर कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला आहे. 343 धावांची आघाडी घेतल्यानंतर कालच्याच सहा बाद 493 धावांवर आपला पहिला डाव टीम इंडियाने घोषित केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा बांगलादेशच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम वगळता बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर फार काळ तग धरता न आल्यामुळे बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक चार फलंदाजांना माघारी धाडले.
टीम इंडियाने मयांक अगरवालच्या खणखणीत द्विशतकाच्या जोरावर इंदूर कसोटीच्या पहिल्या डावात 343 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर सहा बाद 439 धावा ठोकल्या होत्या. 243 धावांची दमदार खेळी मयांक अगरवालने खेळली. त्याच्या या खेळीत 28 चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. मयांकने रहाणेसह 190 धावांची भागीदारी रचली होती. अजिंक्य रहाणेने नऊ चौकारांसह 86 धावांचे योगदान दिले.
click and follow Indiaherald WhatsApp channel