अमेरिकन कंपनी हेनेसीची हाय स्पीड कार वेनोम जीटी दिसायला जेवढी सुंदर आहे, तेवढीच वेगवान आहे. ही कार ताशी 435 किमी वेगाने धावणाऱ्या जगातील सर्वात वेगवान कार पैकी एक आहे. मात्र एका गोष्टीत अद्यापही ही कार मागे आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमध्ये या कारची टेस्ट ड्राईव्ह करण्यात आली. यावेळी या कारने नवीन विक्रम बनवला.

जगातील सर्वात वेगवान कारचा विक्रम बुगाटी वेरोन सुपर स्पोर्ट कारच्या नावावर होता, जी ताशी 431 किमी वेगाने धावते. हाय स्पीडच्या बाबतीत या कारने विक्रमाची नोंद केली असली तरी देखील विक्रम बुगाटीच्याच नावे राहणार आहे. कार वेनोमच्या ड्रायव्हरने स्पेस सेंटरच्या पट्टीच्या एका बाजूने (वन वे) गाडी चालवली.

विक्रमासाठी गाडी हवेच्या अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही दिशेंना चालवणे गरजेचे असते. या ड्राईव्ह टेस्टवेळी गाडीचा चालक ब्रायर स्मिथ होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel