राजकारणात नेताजी नावाने प्रसिद्ध असलेले उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे मुख्य मुलायमसिंग यादव यांची बायोपिक तयार होत असून त्याचा टीझर युट्यूब वर नुकताच रिलीज करण्यात आला. बॉलीवूड मध्ये गेले काही दिवस स्पोर्ट्स पर्सनवर बायोपिक बनविण्याची एक लाट आली होती आता त्यात राजकीय नेत्यांची भर पडताना दिसत आहे.
मुलायमसिंग यांनी केंद्रात संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्याच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात शेतकऱ्याचा एक मुलगा सुरवातीला पहिलवान म्हणून व नंतर राज्याचा सर्वात मोठा नेता म्हणून कसा उदयाला आला ही प्रेरणादायी कथा सांगितली जाणार आहे.
‘ मै मुलायमसिंग यादव’ असे या चित्रपटाचे नाव असून मुख्य भूमिकेत अमिथ सेठी आणि सुवेंदूराज घोष हे आहेत. अन्य कलाकारात सुप्रिया पाठक, सयाजी शिंदे, जरीना वहाब यांचा समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुवेंदूराज घोष यांनीच केले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel