पुणे – महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने राज्य स्तरीय कबड्डी पंच परीक्षा रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2019 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी पंच परीक्षा उजळणी वर्ग दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी 2017-2018 पर्यंत जिल्हा स्तरावरील पंच परीक्षा पास झालेले परीक्षार्थी अर्ज करू शकतात.
ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या पंच परीक्षेतील परीक्षार्थीना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही. ज्या परीक्षार्थींना परीक्षा द्यायची आहे त्यांनी पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel