आज बर्मिंघम 2022 राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या टी-20 क्रिकेटला मान्यता देण्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या संयुक्त बैठकीनतंर राष्ट्रकुल क्रीडा महासंघ, सीजीएफने जाहीर केले आहे. याबाबत माहिती देताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु सावनी यांनी म्हटले, महिलांच्या क्रिकेटसाठी आणि जागतिक क्रिकेट समुदायासाठी ही खरोखर ऐतिहासिक बाब असून ज्यांनी या बैठकीच्या समर्थनार्थ एकता दर्शविली. सध्याच्या घडीला महिला क्रिकेट हे अजून बळकट होत चालले आहे आणि आम्हाला आनंद आणि सन्मानित वाटत आहे की कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशनने बर्मिंघम 2022 मध्ये महिलांचे टी-20 क्रिकेट समाविष्ट करण्यासाठी मतदान केले.
आठ महिला संघ २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळतील. क्रिकेटला 1998 नंतर पहिल्यांदा पहिल्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत मान्यता मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कुआलालंपूर येथे 1998 मध्ये पुरुषांच्या 50 ओव्हरच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. 27 जुलै ते 7ऑगस्ट, 2022 दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धा इंग्लंडमध्ये बर्मिंघम होणार आहेत. 845मिलियन युरो इतका खर्च या नियोजनासाठी अपेक्षित आहे. यामध्ये तब्बल 4,500 खेळाडू 18 गेम्समध्ये भाग घेणार आहेत. महिला टी-20 चे हे आठही सामने एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर खेळवले जातील. दुसरीकडे, महिला क्रिकेट व्यतिरिक्त व्हॉलीबॉल आणि दिव्यांगांसाठीच्या एका क्रीडा प्रकारचा देखील राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश केला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel