करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी सध्या देशातील हिंदूंचे फार हाल सुरु असून देशाला जर संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल, असे म्हटले आहे. सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात ते बोलत होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. आज विजयादशमी दिवशी गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता होते. हजारो धारकरी या समारोप दौडीत धावले.
करणी सेनेचे अजयसिंह सिंगर यावेळी म्हणाले, सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू असून संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्मगुरु आहेत. देशाला जर संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदूधर्म वाचेल. दौडीच्या सांगता समारंभास शिवसेना खासदार धैर्यशील माने, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी उपस्थिती लावली होती.

click and follow Indiaherald WhatsApp channel