राज्यात राहणाऱ्या सर्वांना मराठी भाषा आलीच पाहिजे. त्यांनी मराठी बोलणं, शिकणं आणि वाचनं गरजेचं आहे. त्यासाठी राज्यातल्या सर्व शाळांना पहिली ते दहावी मराठी सक्तिची केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामतीत केली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी बारामतीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील विजय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

तसेच बारामती शहर व तालुका नागरी सत्कार समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शरद पवार व त्यांच्या सहचारिणी सुनेत्रा यांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘शाळा कुठलीही असो त्यांना मराठी आलंच पाहिजे. काही मुलं जास्त गुण मिळविण्यासाठी इतर विषय घेतात. पण केवळ गुणांकडे बघू नका,आपली मातृभाषणं उत्तम पद्धतीनं येणं गरजेचं आहे असंही पवार यांनी सांगितलं.

 

दरम्यान, सत्ता आली तरी ती डोक्यात जाऊ देऊ नका. गैरप्रकार, गैरव्यवहार करू नका, कुठे चुकलं तर अधिकाऱ्यांशी वाद घालू नका असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बारामतीच्या विकासासाठी यापुढेही काम करणार असल्याचं ते म्हणाले.                                                             

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: