मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याझपाट्याने वाढत चालली आहे. राज्यात आज नव्या 431 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 649 वर पोहोचली आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 683 वर पोहोचला आहे. तर पुणे शहर आणि ग्रामीण भागात एकूण 753 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तर दुसरीकडे आज राज्यात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 10, पुणे 2, औरंगाबाद 2 तर कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगावात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यात 18 पैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel