राज्य सहकारी बँकेतील कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार , हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण,आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते – पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह सर्व माजी संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या सगळ्यांचा अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न होता. काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर अटकेची कारवाई झालीच तर संरक्षण मिळावं यासाठी हा प्रयत्न असल्याचं बोललं जात होतं.
तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. संचालकांच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने या सर्वच्या सर्व सहाही याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे या प्रकरणात कोणालाच दिलासा मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टाचे न्या. अरुणकुमार मिश्रा आणि न्या. एम. आर. शहा यांनी या याचिका फेटाळल्या आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel