औरंगाबाद : शहरात काल 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 901 झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांमुळं औरंगाबादेत लॉकडाऊन आणखी कठोर करण्यात आलं आहे.

 

आता जिल्हाभरात 20 मेपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन असणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. आतापर्यंत 255 रुग्ण या आजारातून बरे झाले आहे. तसेच 26 रुग्णांचा बळी या आजारानं घेतला आहे. दरम्यान काल आढळून आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे कंसात रुग्णांची संख्या

 

एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1), शंभू नगर (7), सिटी चौक (1), कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 33 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: