नवीन वर्षाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. २०१९ या वर्षात तिच्या आयुष्यातील काही संस्मरणीय घटनांना यात तिने स्थान दिले आहे. मॅडम तुसाद म्यूझियममधील तिच्या पुतळ्यापासून ते ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटातील घटनांचा या व्हिडिओत समावेश आहे. खासगी आयुष्यातील काही घटनांचाही यात तिने समावेश केला असून तिचा पती निक जोनासही यात दिसून येतो.

 

व्हिडीओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये प्रियंकाने म्हटले आहे की, एका वर्षाची आणखी एक भेट. २०२० च्या पेटाऱ्यामध्ये काय दडलंय याची प्रतीक्षा करु शकत नाही. ईश्वर आणि इतर सर्वांचे आभार, माझ्या आयुष्यात ज्यांनी आनंद आणला. प्रियंकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

 

अलिकडे ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका झळकली होती. तिच्यासोबत यात फरहान अख्तर, झायरा वसिम, आणि रोहित शराफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘द स्काई इज पिंक’ या चित्रपटात प्रियंका ३ वर्षानंतर झळकली होती. यासोबतच तिने ‘फ्रोजन 2’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचे हिंदी डबिंग केले होते.                                                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: