नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 हजार 380 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 1463 रुग्ण आढळून आले आहे. तसेच याच कालावधीत 60 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा आता 886 वर गेला असून आतापर्यंत 6 हजार 362 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
आज दुपारी आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी देशात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ जरी होत असली तरी कोरोना पासून अनेक रुग्णांना बरे करण्यास सरकारला यश येत असल्याचं म्हंटल आहे. ही आपल्यासाठी समाधानाची बाब आहे.
तसेच लॉकडाऊनमुळं गेल्या 28 दिवसात 14 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर 14 दिवसात देशातील 85 जिल्ह्यात एकाही नव्या रुग्णांची नोंद झालेली नसल्याची माहिती त्यांनी म्हंटल आहे. त्यामुळं कोरोनाच्या संकटात देशाला हा मोठा दिलासा मिळाला आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel