केपटाऊन : साऱ्या जगात कोरोनामुळे हाहाकार माजला असून कोरोनाचा धोका दिवसेंदिवस भारतातही वाढत आहे. फक्त सामान्यांना नाही तर बॉलिवूड आणि क्रीडा विश्वालाही याचा फटका बसला आहे. यातच बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. एका पार्टीत कनिका उपस्थित असल्यामुळे तिच्यावर कारवाईही करण्यात आली होती. पण आता दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ कनिकामुळे अडचणीत आला आहे.
लखनऊमध्ये एका पार्टीमध्ये कनिका उपस्थित होती. अनेक राजकीय नेते मंडळीही या पार्टीत सामिल झाले होते. पण ज्या हॉटेलमध्ये कनिका स्थायिक होती, तेथेच आफ्रिकेचा संघही होता. त्यामुळे त्यांना आता दुसऱ्यांदा क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. याआधी भारत-दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. आता कनिका कपूरमुळे दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची चिंता वाढली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel