तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या इस्त्राईल देशाने असा दावा केला आहे की आम्ही कोरोना विषाणूची लस बनविली आहे. इस्त्राईलचे संरक्षणमंत्री नफताली बेनेट यांनी हा दावा केला आहे.

या दाव्यात त्यांनी असं म्हंटल आहे की इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चने (आयआयबीआर) कोरोना विषाणूची प्रतिपिंडे विकसित करण्यास यश मिळविले आहे. 

त्यांच्या दाव्यानुसार आयआयबीआर इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्राईलने कोरोना विषाणूची लस विकसित केली आहे. संस्थेने प्रतिपिंडे बनवले आहेत. तसेच या लसीची मोठ्या प्रमाणावर निर्मितीची तयारी सुरू झाली आहे.

आयआयबीआर ही इस्रायलमधील अत्यंत गुप्त संस्था आहे. बाहेरील जगाला येथे केलेल्या प्रयोगांविषयी फारशी माहिती मिळत नाही. पण नेस जिओना भागात असलेल्या या प्रयोगशाळेला भेट दिल्यानंतर नफताली बेनेटने जगभरातील लोकांना लस देण्याची चांगली बातमी दिली.

टाइम्स ऑफ इस्त्राईलच्या वेबसाइटसह अनेक माध्यम संस्थांनी ही बातमी प्रसिद्ध केली आहे. नफ्ताली बेनेट यांनी सांगितले की हे अँटीबॉडी एकपक्षीय पद्धतीने कोरोना विषाणूवर हल्ला करते. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या शरीरातील व्हायरस दूर करते. यानंतर, हा विषाणू शरीराच्या इतर भागांमध्ये किंवा दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरत नाही.

इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्च देशाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. या लॅबने आता ही लस पेटंट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर हे मोठ्या प्रमाणात तयार केले जाईल जेणेकरुन जगभरातील लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल.

बेनेट म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादनासाठी आम्ही जगभरातील कंपन्यांशी बोलू. इस्रायल इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल रिसर्चच्या संपूर्ण टीमचा मला अत्यंत अभिमान आहे. तथापि, या लसीची नैदानिक चाचणी किंवा मानवी चाचणी झाली आहे की नाही हे बेनेट यांनी आपल्या निवेदनात म्हटले नाही.

ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात सर्वात मोठी मानवी चाचणी घेण्यात येत आहे. चीन-अमेरिका देखील या कामात व्यस्त आहे. कोरोना लस तयार करण्यात भारतातील सुमारे अर्धा डझन कंपन्याही सामील आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: