शिरूर – कोल्हापूर-सांगली परिसरात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हजारो नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज शिरूर शहरात माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली मदतफेरी काढण्यात आली. याद्वारे शहरातून एक टेम्पो गृहोपयोगी वस्तू जमा झाल्या.
नागरिकांनी सफरचंद, बिस्किटे, तांदूळ, गहू, साबण, टूथपेस्ट, ज्वारीसह अनेक घरगुती वापराच्या वस्तू मदत फेरीत दिल्या. या सर्व वस्तू उद्या कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्त यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे, हरिदास कर्डिले, सर्जेराव दसगुडे, सचिन पवार, वकिल संघटनेचे शिरीष लोळगे, बिजवंत शिंदे, अतुल चव्हाण, संतोष भंडारी, रुपेश घाडगे, योगेश चव्हाण, संतोष भंडारी, रवी काळे, मुजफ्फर कुरेशी, रंजन झांबरे, राहिल शेख, हापीज बागवान, पल्लवी शहा उपस्थित होते.
click and follow Indiaherald WhatsApp channel