‘ इंद्रायणी शुद्धीकरणाची वारकरी संप्रदाय समाजाची मागणी मला भावली. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे पवार घरण्यातील जन्मलेल्यांचे कर्तव्य राहिल. काळजी करू नका. माझे आश्वासन हे आश्वासन नाही तर ते माझे कर्तव्य आहे, असे ग्वाही माजी केंद्रिय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. यावेळी बोलताना पवार म्हणाले, ‘ नदी पवित्र, सुंदर राहिली तर ती समाजाला उपयुक्त आहे. समासाजासाठीची मागणी असेल तर सरकार पाठीशी उभे राहिेल. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री,पालकमंत्री असण्यासोबत अर्थमंत्रीही आहेत. ते याची दखल नक्की घेतील.’
पवार पुढे म्हणाले, ‘जनतेने जो अधिकार दिला, त्या अधिकाराचा उपयोग समाजासाठी करायचा असतो, असे संस्कार माझे गुरू आणि श्रद्धास्थान स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिले. मिळेल ती संधी, अधिकार ज्याच्यामुळे मिळाले, त्याचे विस्मरण होऊ देऊ नका, असे त्यांनी आम्हाला शिकवले.” “”शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षण संस्था आज कशाचीही सुविधा नसताना सामान्य माणसाच्या श्रद्धेतून दिमाखात उभी राहिली,”
तसेच बाराव्या शतकापासून वारकरी पंरपरा मोठ्या स्वरूपात उदयाला आली. देशाने मोगलांचे आक्रमण पाहिले, ब्रिटिशांचे दीडशे वर्षांचे राज्य पाहिले. त्यानंतर अनेक हल्ले पाहिले. यामध्ये जगातली कोणतीही आक्रमण करणारी शक्ती संतपरंपरेच्या विचाराला थोपवू शकली नाही. याला कारण संप्रदायाबद्दल असलेली वारकऱ्यांची बांधीलकी, हेच आहे. वारकरी संप्रदायाची विचारधारा जतन करून समाजाच्या सर्व घटकांमध्ये पोचविण्याचे काम वारकरी संस्थेतील संतमाहात्म्यांनी करून त्यास उत्तम स्वरूप दिले. असेही पवार यावेळी म्हणाले.
click and follow Indiaherald WhatsApp channel