सांगली कोल्हापुरात महापूराने अनेकांची आयुष्य देशोधडीला लागलीयेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक पुढे ढकला आणि कोल्हापूर-सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. आचारसंहिता जाहीर झाली की मग मदत मिळणार नाही. मग सरकार हात वर करणार… जबाबदारी झटकणार… या सरकारला संवेदनशीलता राहिलेली नाही, अशी जोरदार टीका राज यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.                                                                     

चंद्रकांत पाटील म्हणतात, पावसाचा सरकारला अंदाज आला नाही. तुम्हाला 250 जागांचा कसा अंदाज येतो???, असं म्हणत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

भाजपला सत्तेचा माज आल्याने जनतेशी त्यांना काहीही देणंघेणं नाही, असंही राज म्हणाले आहेत.                   

                                                                                          

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: