
औरंगाबाद: मोठी चरशी ची ठरलेली औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत राज्यभर चर्चेचा विषय राहिली. सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे याचा एम आय एमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केले होता.या पराभव नंतर 15 ऑगस्ट मध्ये पहिल्यादा समोरा-समोर आले. खैरे यांनी जलील यांची खांद्यावर हात ठेवत स्मित हास्य केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयात या दोन नेत्यांनी एक मेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख युतीचे उमेदवार अंबादास दानवेंनी खासदार जलील यांची विशेष भेट घेत फोटोशेषण केले. सोबत होते आमदार संजय सिरसाट होते.
या माध्यमातून एम आयएम ची मते आपल्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याची चर्चा होत आहे. एमआयएमकडे २८ मते आहेत. ही मते कुणीकडे जातील अजून एमआयएमने निर्णय घेतलेला नाही.