राज्यातील मुस्लिम समुदायाला शैक्षणिक संस्थेमध्ये 5 टक्के आरक्षण दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या संदर्भातील प्रस्ताव बजेट सत्रावेळी विधानसभेत सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यासोबतच नोकऱ्यांमध्ये देखील आरक्षण देण्यासंदर्भात सरकार विचार करत असून, सरकार कायदेशीर बाजू विचारात घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
नवाब मलिक म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर देखील मागील सरकारने मुस्लिमांना आरक्षण दिले नव्हते. या सत्राच्या अखेरपर्यंत आम्ही मुस्लिमांना शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ.
मुस्लिम समुदायाला देण्यात येणारे 5 टक्के आरक्षण हे सध्याच्या कोट्यामध्येच देण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांपेक्षा अधिक झालेला आहे. मागील वर्षी मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. आरक्षणाची मर्यादा 50 टक्के असल्याने हे आरक्षण कशाप्रकारे दिले जाईल हे अद्याप ठाकरे सरकारने स्पष्ट केलेले नाही.
click and follow Indiaherald WhatsApp channel